सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : देशातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. केंद्र सरकारने घेतलेल्या या मोठया निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ होणार आहे.

पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल.

असे होणार विलीनीकरण:

विलीनीकरण- १ : पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया.

विलीनीकरण २ : कॅनरा बँक, सींडिकेट बँक

विलीनीकरण ३: युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक (पाचवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल.)

विलीनीकरण ४ : इंडियन बँक, अलाहाबाद बँक (सातवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल.)