टीम AM : पावसाळ्यात घराच्या आजूबाजूला सरपटणाऱ्या जीवांचा वावर वाढतो आहे. अशीच धक्कादायक घटना सोशल मिडियावर समोर आली आहे. एका नागरिकाने रोजच्या सवयीप्रमाणे शूज घालण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या शूजमध्ये थेट कोब्रा साप निघाला !
सुदैवाने त्या नागरिकाने शूज घालण्याआधी नीट पाहिले आणि वेळेवर सावध झाल्याने मोठा अनर्थ टळला. तत्काळ सर्पमित्रांना बोलावून साप सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागरिकांनी पावसाळ्यात घरातील कोपरे, बूट – चप्पल, टोपल्या, शेतमालाच्या पोत्या अशा जागा वापरण्यापूर्वी नीट पाहाव्यात, अशी विनंती प्रशासन आणि सर्पमित्रांनी केली आहे.
पावसाळ्यात खालील गोष्टी लक्षात ठेवा :
- शूज वापरण्यापूर्वी उलटे करून झटका द्या.
- घराच्या आसपास स्वच्छता ठेवा.
- झाडाझुडपांजवळील वस्तू हाताळताना काळजी घ्या.
- सर्प दिसल्यास त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधा.
आपल्या जराशा सावधगिरीमुळे जीव वाचू शकतो. शूज घालायच्या आधी एकदा पाहा… कारण आत कोण असेल सांगता येत नाही !