टीम AM : माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पण यावेळी कारण आहे त्यांचा डान्स व्हिडीओ. जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ‘किसी के हाथ ना आएगी ये लड़की’ या गाजलेल्या गाण्यावर त्यांनी जबरदस्त डान्स करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
व्हिडीओमध्ये नवनीत राणा यांनी गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्याचबरोबर हातात पारदर्शक छत्री घेऊन त्यांनी एका रेट्रो स्टाईलमध्ये स्टेजवर एन्ट्री घेतली आणि डान्स करत सर्वांची मनं जिंकली आहेत.
नवनीत राणा यांचा हा अंदाज प्रेक्षकांना इतका आवडला आहे की, व्हिडीओ फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यांच्या स्टाईल आणि कॉन्फिडन्सचं कौतुक केलं आहे.
सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल
डान्स दरम्यान नवनीत राणा यांचा आत्मविश्वास, हावभाव आणि हटके स्टेप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या हटके डान्सचं जोरदार कौतुक होत आहे. काही चाहत्यांनी तर त्यांच्या या डान्सची तुलना बॉलिवूडच्या अभिनेत्रीला टक्कर देणारा डान्स अशी म्हणत केली आहे. राजकारणात सक्रिय असलेल्या नवनीत राणा यांचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांसाठी नक्कीच एक खास आकर्षण ठरला आहे.
नवनीत राणाचा हा व्हिडीओ पावसाळ्यामधील असल्याचे दिसत आहे. दोन्ही बाजूने उंच बांबूची झाडे आणि हिरवळ वातावरण त्यामध्ये मधून रस्ता आणि या रस्त्यावर नवनीत राणांचा प्रसिद्ध गाण्यावर जबरदस्त डान्स पाहून सर्वच त्यांचे कौतुक करत आहेत.