टीम AM : अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते. त्यामुळे ती बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल देखील होते. तर काही वेळेस चाहत्यांकडून तिला चांगला प्रतिसाद देखील मिळतो.
अभिनेत्री राजेश्वरी खरातने आता आलिया भटच्या गंगुबाई काठियावाडी सिनेमातील ‘मेरी जान’ या गाण्यावर खास रील शूट केलंय. यावेळी तिने तिच्या सौंदर्याची झलक दाखवलेली पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.