प्रा. अंबादास फटांगरे यांना पीएच.डी.

अंबाजोगाई : वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथील शारीरिक शिक्षण विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले अंबादास सोमनाथ फटांगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. नागनाथ गजमल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ योग प्रशिक्षणाचा महिलांच्या निवडक रूपशास्त्रीय व शरीरविज्ञान शास्त्र घटकांवर होणारे परिणाम ‘ या विषयावर संशोधन करण्यात आले.त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव राजेंद्र लोमटे व संचालक मंडळातील सर्व सदस्य, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.आखिला सय्यद, प्रभारी प्राचार्या अलका वालचाळे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सर्व सहकारी यांनी अभिनंदन केले.