बिग बींची होणार वेब सिरीजमध्ये एंट्री ?

मुंबई : डिजिटल माध्यमात सध्या वेब सिरीजकडे मोठया प्रमाणावर प्रेक्षक आकर्षित होत आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रभाव पाहून अनेक स्टार कलाकारांनी वेब सिरीजमध्ये एंट्री केली आहे. यातच आता बॉलीवुडचा महानायक अमिताभ बच्चन देखील वेब सिरीजमध्ये झळकणार असल्याची माहिती आहे.

बिग बींनी डिजिटल विश्वात पदार्पण करण्याची इच्छा अलीकडेच बोलून दाखवली होती. ‘एखाद्या चांगल्या वेब सीरिजमध्ये काम करायला मिळालं, तर मी नक्की करेन’, असं ते म्हणाले होते. त्यांनंतर एका बड्या डिजिटल प्लॅटफॉर्मनं बिग बींना ऑफर दिल्याचं समजतंय.