सोमवारपासून घंटा वाजणार : ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा होणार, वाचा…

टीम AM : सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. विदर्भ वगळता राज्यात इतर सर्व विभागांत 16 जूनपासून शाळा सुरू होत आहेत, विदर्भात एका आठवड्यानंतर 23 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. 

शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी तसंच मुलांची उपस्थिती वाढवण्याकरता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांना नजिकच्या शाळेत भेट देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकताच या नियोजनाचा आढावा घेतला. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी, या भेटीदरम्यान उपाययोजना सुचवाव्यात, असं आवाहन सौनिक यांनी केलं आहे.