अंबाजोगाई : पावसाअभावी खुंटलेल्या सोयाबीन पिकात दुधदुभते जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे माञ, फवारलेले सोयाबीन खावून संबंधित जनावरे विषबाधा होवून दगावत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून पाणी-चारांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना चारा-पाणी विकत घेवून पशुधन सांभाळण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील बर्दापूर, सायगांव सह आदी खेड्यापाड्यातील गावामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने मारलेल्या दिर्घ दडीमुळे खरिपांची वाळत असलेली पिके पाहून शेतकरी रडकुंडीला आला आहे.यात हताश आणि गरिबीत खितपत पडलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात चक्क नांगर फिरवल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे.तर जनावरांचा चारा विकत न घेवू शकलेले शेतकऱ्यांवर आपली दुधदुभती जनावरे चक्क सोयाबीनच्या पिकांमध्ये सोडून देण्याची वेळ आली आहे.माञ सोयाबीन पिके खाल्ल्याने विषबाधा होवून संबंधित जनावरे मृत पावत असल्याच्या घटना घडत आहेत.अशीच एक घटना येथून जवळच असलेल्या सनगाव येथे घडली.पावसाअभावी वाळू लागलेले सोयाबीन जनावरांना खायला दिले असता एका म्हशीचा मृत्यू झाल्याची चर्चा होत आहे.
फवारलेले सोयाबीन जनावरांचा ‘काळ’ बनत आहे की काय ?
शेतकरी वर्गाचे मुख्य पिक असलेल्या सोयाबीन पिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटली आहे.परंतू,त्यावर फवारलेले विषारी औषध आज दुधदुभत्या जनावारांचा कर्दनकाळ बनला आहे.मोठ्या पावसात सोयाबीन पिकांवरील औषध धूवून जाते माञ फवारल्यापासून मोठा पाऊस झालाच नाही त्यामुळे पिके विषारीच राहिली आणि ती पिके खावून काही जनावरांना आपला जीव गमवण्याची वेळ येत असल्याची चर्चा होत आहे.