टीम AM : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीनं आणि परिणामकारकरित्या देण्यासाठी देशभरात ‘ॲग्रिस्टॅक’ योजना राबवण्यात येत आहे.
यात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने सर्वाधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करत अग्रस्थान पटकावलं आहे.
कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी ही माहिती दिली. राज्यात 1 कोटी 71 लाख 10 हजार 697 शेतकऱ्यांची बँक खाती आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 1 कोटी 8 लाख 91 हजार म्हणजे सुमारे 64 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी 16 जुलैअखेर पूर्ण झाली असून, महसूल आणि कृषी विभागानं त्यापैकी 97 लाख 39 हजार 299 शेतकऱ्यांची नोंदणी मंजूर केली आहे.