वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळांचा करा आहारात वापर

टीम AM : माणसाच्या आरोग्यावर बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक वाईट परिणाम होत आहेत. त्यातच वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण अनेक पर्यायाचा वापर करतात. मात्र, दैनंदीन आहारात काही फळांचा समावेश केल्यास आपणाला वजन कमी करण्यासाठी त्याचा नक्की फायदा होवू शकतो.

नारळपाणी

नारळपाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल कमी होवून चरबी कमी होण्यास मदत होते. नारळ पाण्याने शरीरातील पचन संस्थाचे व्यवस्थित कार्य चालते. यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देखील मिळत असते.

सफरचंद

सफरचंदमध्ये कँलरी कमी असून विटामिन सी, मिनिरल्सबरोबर फायबरची मात्रा जास्त प्रमाणात असते. त्यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.

अननस

अननसात शरीरासाठी आवश्यक असणारे विटामिन, फायबर, मिनरल्सबरोबर अँटिऑक्सिडेंट असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

द्राक्षे

द्राक्ष्यामध्ये विटामिन सी आणि फायबरची मात्रा असल्याने वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. आपल्या आहारात द्राक्षाचा समावेश केल्यास काहीच दिवसांत फरक पडतो.