अंबाजोगाई : महाराष्ट्र एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष जिल्हा रूग्णालय बीड व संत गाडगेबाबा सेवा भावी संस्था अंतर्गत आधार माणुसकीचा उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा पंधरवडा निमित्त युवकांमध्ये एच.आय.व्ही. एड्स बाबत व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने दिनांक 27ऑगस्ट रोजी अंबाजोगाई शहरातील शालेय व महाविद्यालयीन 2500 युवक-युवतींच्या उपस्थितित रॅलीची सुरूवात सकाळी 9 वा. वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालय या ठिकाणाहून सावरकर चौक, शिवाजी चौक, गुरूवार पेठ, पाटील चौक, बसस्टँड मार्गे मुकुंदराज सभागृहात पोंहचली.
रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. धपाटे, डॉ. बगाटे, डॉ. अनुराधा शेंडगे, (ए.आर.टी. सेंटर), आर. एन. राऊत, प्रशांत बर्दापूरकर यांची उपस्थिति होती. रॅलीच्या सुरुवातीस महिला महाविद्यालय,वेणूताई चव्हाण विद्यालय,गोदावरी कुंकूलोळ कन्या विद्यालय या शाळेतील मुलींनी रेड रीबीन व हेल्पलाईन क्रमांक १००७ या लोगोचे सादरीकरण केले.
मुकुंदराज सभागृहात संपन्न झालेल्या रॅलीच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी डॉ. संदीप घोणसीक आर. एन. राऊत, सौ. रूपालीताई लोमटे सय्यद सर, ॲड. संतोष पवार, सौ. साधना गंगावणे, सुहास कुलकर्णी तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अरविंद बगाटे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. अरविंद बगाटे यांनी एच.आय.व्ही. एड्स प्रतिबंध तसेच त्यावरील उपचार या बाबत वैद्यकीय क्षेत्रातील महत्वपुर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. संदीप घोणसीकर व श्रीमती शोभा जाधव, सौ. साधना गंगावणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. संतोष पवार यांनी केले, आभार सुहास कुलकर्णी यांनी तर संचालन मंजुषा महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस देशभक्तीपर गीताचे सादरीकरण करून सुभाष शेप यांच्या टिमने युवकांमध्ये चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही. एड्स बाबत शपथ देऊन राष्ट्रगीताने समारोप झाला. उपस्थित मान्यवरांचे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज पवार, विश्वास लवंद, प्रदीप जिरे, राजेश गोस्वामी, संजय सुरवसे, नामदेव मोरे, डी. एन. डांगे, एस. एम. नेहरकर, बापु लुंगेकर, उमेश लुकडे यांनी परिश्रम घेतले.