अंबाजोगाई तालुका संगणक परिचालक संघटनेचे धरणे आंदोलन

अंबाजोगाई : राज्यातील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामाऊन घेण्यासह इतर प्रमुख प्रलंबीत मागण्यासाठी अंबाजोगाई तालुका संगणक परिचालक संघटनेचे काम बंद आंदोलन सुरु असुन पंचायत समिती अंबाजोगाई कार्यालया समोर २८ ऑगस्ट रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम व सध्या आपले सरकार सेवा केंद्राच्या प्रकल्पात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजीटल महाराष्ट्राचे काम करत आहेत.२९ प्रकारचे विविध दाखले, संपुर्ण जमा खर्च नोंद, ऑनलाईन कामकाज, गाव विकास योजना असे विविध कामे मागील ८ वर्षापासुन संगणक परिचालक करत आहे.


परिचालक जबाबदारीने काम करुणही एक – एक वर्ष मानधन मिळत नाही. या पुर्वीही संघटनेने आंदोलने केली आहेत. परिचालक संघटनेला मुख्यमंत्री फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.४ वर्षात दिलेल्या आश्वासनाची कोणतीही पुर्तता या सरकारने केले नाही. १४ व्या वित्त अयोगातून आपले सरकार प्रकल्पास निधी देण्यास राज्यातील ग्रामपंचायतीनेही विरोध केल्यामुळे संगणक परिचालकानां एक- एक वर्ष मोबदला मिळत नाही. त्यामुळे संगणक परिचालकावर उपासमारिची वेळ आली आहे. वेळोवेळी अंदोलन करुण ही आमच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे ऑनलाईन, ऑफलाईन कामकाज करणारे १९ ऑगस्टपासुन काम बंद आंदोलनावर गेले आहेत.

परिचालक संघटनेच्या प्रमुख मागण्या कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी, पं.स. व जि.प. स्तरावरील संगणक परिचालकांना मंत्री मंडळाने मंजूरी दिली असून त्यांना आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती द्यावी, २०१७ते २०२९ पर्यंत रखडलेले मानधन द्यावे, १४ व्या वित्त आयोगातून नं देता शासण निधीतून प्रती महिना किमान१५००० रुपये देण्यात यावा, छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व प्रधानमंत्री आवास योजनेचे ऑनलाई केलेला सर्वेचे मानधन मिळावे, नोटीस न देता कमी केलेल्या संगणक परिचालकांना कामावर घ्यावे अशा मागण्याची दखल शाशन घेणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरुच राहाणार आसल्याचे पदाधीकाऱ्यांनी संगीतले.