दोन तास वाहतूक ठप्प
अंबाजोगाई : तालुक्यातील अंबाजोगाई लातुर रोडवरील सायगाव येथे शेतकऱ्यानी चारा दावणीला द्यावा या मागणीसाठी जनावरासह रस्ता रोको केला. बर्दापूर सर्कलसह सुगाव परिसरात शासणाने दुष्काळी परिस्थिती आसतानां सुध्दा चारा छावणीला दिला नाही नां दावणिला त्यामुळे अनेक शेतकऱ्यानां दुभत्या जनावराला बाजारचा रस्ता दाखवावा लागला आहे. खरिपाची सुगी येईल व चारा पाण्याचे संकट मिटेल आशी आशा होती.अल्पशा पाऊस झाल्यामुळे पिके हातची गेली आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी चारा पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भर सुगीत त्रस्त आहेत. चाऱ्या पाण्याची भयान परिस्थिती निर्माण झाली असुन पशुधन जगवणे शेतकऱ्यानां तारेवरची कसरत बनली आहे.
बर्दापूर परिसरातील शेतकऱ्यानी चारा मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देऊनही शेतकऱ्याच्या मागणिचा सकारात्मक विचार नं केल्यामुळे परिसरातील बर्दापूर, सायगाव,सुगाव,नांदगाव,पोखरी, मुडेगाव, दैठना आदि गावच्या शेकडो शेतकरी बांधवानी आपल्या जनांवरासह सायगाव येथे रस्ता रोको केला.
चारा दावणीला तात्काळ दयावा, पिकांचे पंचनामे तात्तकाळ करावे, दुष्काळ जाहिर करुण शेतकऱ्यानां जास्ती जास्त अनुदान देण्यात यावे. अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी या वेळी केल्या. रस्ता रोको मुळे दोन तास वाहतूक खोळंबली होती.रस्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्याचीं नायब तहसिलदार,मंडळ आधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन लवकर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील असे अश्वासन देऊन निवेदन स्विकारले. रस्तारोको मध्ये कांही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बर्दापूर पोलीस स्टेशनच्या वतीने पो.नि. लक्ष्मण केंद्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.