अंबाजोगाई : अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप पाऊस पडला नसल्यामुळे शेतातील पिके पुर्ण पणे करपली आहेत. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा मोठे संकट आले असून तात्काळ या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई व या पुर्वीचे अनुदान तात्काळ वाटप करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व बीड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिन भैय्या मुळुक यांच्या नेतृत्वाखाली व केज अंबाजोगाई मतदार संघाचे संपर्क प्रमुख परशुराम जाधव यांच्या उपस्थितीत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी परशुराम जाधव यांनी वरिल विषयासह धान्याचा काळा बाजार, शेतकरी स्वाभिमानी योजनेचे दोन हजार रूपयांची यादी जाहीर करा या विविध विषयांवर तहसिलदार यांच्याशी चर्चा केली यावेळी तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हासह.संघटक अशोकगाढवे, विशाल घोबाळे, उप तालुका प्रमुख वसंत माने, खंडु पालकर, नाथराव मुंडे, महादेव आरसुडे,उप शहर प्रमुख गणेश जाधव, शिवकांत कदम, संघटक अशोक काळे, समन्वयक अर्जुन जाधव, सुदर्शन निकम, युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भूमकर,विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख अभिमन्यू वैष्णव,दिनेश उपरे, राहुल थावरे,बिटू चाटे, विकास धावडे,अरूण कदम,सोमासे गोपाळ, गोविंद आरसुडे, नरसिंग जाधव, राजेभाऊ गायकवाड, राम भोसले,दगडु जोगदंड, बालाजी जागतिक, श्रीकिशन जाधव, दयाराम घुले, नारायण गवारे,रवि मुडेगावकर, रोहन जोशी, श्रावण गायके, नागेश गुजर,दिलीप खरटमोल यांच्या सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.