टीम AM : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जवळपास 77 टक्के हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 88 टक्के पेरणी झाली असून हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी 64 टक्के पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 87 पूर्णांक 35 टक्के, जालना सुमारे 70 टक्के, बीड 68, परभणी 71 पूर्णांक 35, नांदेड 81 तर धाराशिव जिल्ह्यात 83 पूर्णांक 55 टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत.
मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या 121 टक्के पावसाची नोंद झाली असल्याचं हवामान विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.