टीम AM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत आठवड्यातच इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केला होता. त्यानंतर विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीचा निकाल केव्हा लागणार ? याविषयीची उत्सुकता लागली होती.
अखेर आज (दि.13) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाने यावर्षी दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला. कोकण विभागाने अव्वल स्थान पटकवत, 96.14 टक्क्यांसह यंदादेखील मुलींनीच दहावीच्या निकालात बाजी मारली आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहायला मिळणार आहे.
या संकेतस्थळावरून निकाल पाहता येणार
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org
मुलींनी मारली बाजी
कोकण विभागाने 98.82 टक्केवारीसह याही वर्षी १० वीच्या निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14 आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 92.31 टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 3.83 टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे इयत्ता 10 वीच्या परीक्षेत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे