न्या. भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती, वाचा…

टीम AM : न्या. भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (14 मे) न्या. गवईंना देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली.

न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीश बनणारे दुसरे दलित समाजातील व्यक्ती असतील. यापूर्वी, 2007 साली सरन्यायाधीशपद भूषवलेले के. जी. बाळकृष्णन हे दलित समाजातील होते. बाळकृष्णन यांनी तीन वर्षे सरन्यायाधीशपद भूषवलं होतं.

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वडील रा. सू. गवई हे भारतातील दलित चळवळीतले महत्त्वाचे नाव होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात, देशाच्या संसदेत त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच, राज्यपालपदाची जबाबदारीही रा. सू. गवईंनी पार पाडली होती