टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारात अज्ञात हिंस्त्र श्वापदाने गोठ्यात घुसून सात शेळ्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात शेतकरी बळीराम बाबुराव केंद्रे यांचे अंदाजे एक लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधित वनविभागाने तातडीने श्वापदाचा बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. या घटनेमुळे डोंगर पिंपळा व परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.



