टीम AM : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’ यंत्रांबाबत वंचित बहुजन आघाडीने शंका उपस्थित केली आहे. 2 डिसेंबरला बहुतांश ठिकाणी मतदान पार पडले असून काही प्रभागांमध्ये 20 डिसेंबरला मतदान होणार आहे.
मात्र, सर्व मतमोजणी 21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी होणार असल्याने त्या वेळेपर्यंत ‘ईव्हीएमची’ बॅटरी सुरळीत राहील का ? तसेच या यंत्रांना चार्ज करण्यासाठी काही अधिकृत सुविधा उपलब्ध आहे का ? असे प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पत्रकार परिषदेत मांडत उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.



