महामानवाला अभिवादन करण्यासाठी ‘चैत्यभूमी’ वर जनसागर लोटला : मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वपूर्ण आश्वासन…!

टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, पुढील महापरिनिर्वाणदिनापूर्वी हे स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अथांग असून, त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल कितीही बोलले तरी ते कमीच असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. 

आनंदराज‌ यांनी केलेल्या सूचनांवरही विचार करून आवश्यक व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला आहे. आज 6 डिसेंबर रोजी लाखों भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनचं चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. यानिमित्ताने राज्यपाल आचार्य देवव्रत,, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here