टीम AM : सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्यातील कोणतीही निवडणूक पुढे ढकलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 31 जानेवारीपूर्वी दिलेल्या मुदतीतच सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाला यामुळे पूर्णविराम मिळाला असून, आता या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजीच जाहीर होणार आहे.
राज्यात नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांच्या निर्णयांविरोधात काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वेळापत्रकातचं निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार असून, सर्व प्रशासनिक घडामोडींना गती मिळणार आहे.



