वंचित बहुजन आघाडीच्या सत्तासंपादन महारॅलीला प्रचंड प्रतिसाद

डॉ. संतोष तावरे यांनी केले भव्य स्वागत

अंबाजोगाई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या एक दोन दिवसात जाहीर होऊन आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने कामास लागले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि भारिप महासंघ यांच्या तर्फे सत्तासंपादन महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे आगमन केज आणि अंबाजोगाई येथे झाले. यावेळी केज विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉ. संतोष दादाराव तावरे व भारिप महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या वतीने केज आणि अंबाजोगाई शहरात भव्य स्वागत करण्यात आले.

नागपूर येथून निघालेली वंचित बहुजन आघाडी आयोजित सत्तासंपादन महारॅलीचे चे स्वागत बीड जिल्ह्यातील केज आणि अंबाजोगाई या तालुक्यात जोरदार करण्यात आले. अंबाजोगाई शहरात या रॅलीचे स्वागत वंचित आघाडीचे इच्छुक उमेदवार, अंबाजोगाई शहराचे भूमिपुत्र डॉ. संतोष तावरे व वंचित बहुजन आघाडी आणि भारिपचे पदाधिकारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच सत्तासंपादन महारॅलीचे वंचित बहुजन आघाडी चे पार्लमेंट बोर्ड सदस्य अँड.अण्णाराव पाटील महासचिव यशपाल भिंगे, सचिव नवनाथ पडळकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. डॉ संतोष तावरे यांनी यावेळी सत्ता संपादन महारॅली मध्ये पूर्ण सहभाग दाखवून आपणच कसे केज विधानसभेसाठी योग्य उमेदवार ठरू असे डॉ. संतोष तावरे यांनी शक्तिप्रदर्शन करून दाखवून दिले . यावेळी तावरे मित्र मंडळ व भारिप बहुजन महासंघ बीड जिल्हा पूर्व चे अध्यक्ष प्रा. बळीराम सोनवणे रामचंद्र संतराम इंगळे आदी सर्व जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीच्या या महारॅलीस सर्व बहुजन वर्गातील हजारो मतदार उपस्थित राहून जोरदार प्रतिसाद दिला. डॉ. संतोष तावरे, सर्व कार्यकर्ते यांनी या रॅली च्या रुपाने आपला जनसंपर्क आणि लोकप्रियतेचे प्रदर्शन घडवून आपणासच वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्याचा अतोनात प्रयत्न करण्यात आला.