खोलेश्वर महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त व्याख्यान
अंबाजोगाई : 17 सप्टेंबर 1948 मध्ये मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. निजामी राजवटीमध्ये 1938 ते 1948 या काळात रझाकारांनी अनन्वित अत्याचार केले. हे जरी खरे असले तरी परंतू, निजामी राजवटीत काही चांगल्या बाबी ही होत्या. त्याकडे माञ दुर्लक्ष होवू नये, निजामकालीन अंबाजोगाईतील जल व्यवस्थापन, वाहतुक व्यवस्थापन, दळण-वळण व्यवस्था तसेच दर्गाह, शाह बुरूज, तलाव,विहीरी, घोड्यांचे तबेले, जलतरण तलाव, पुल आदींची बांधकामे आजही पक्की व मजबुत आहेत. त्यामुळे या चांगल्या बाबींकडे ही पाहिले पाहिजे. यासाठी इतिहास तटस्तपणे अभ्यासावा असे आवाहन मुजीब काझी यांनी केले. ते येथील खोलेश्वर महाविद्यालयात मंगळवार,दि.17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी तर समिती सदस्य अॅड.मकरंद पत्की, समिती सदस्या सौ.लताताई पत्की, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, उपप्रचार्य डॉ.मुकुंद देवर्षी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी इतिहासाची जाणिव, जागृती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी राष्ट्रीय चर्चासत्र, भित्तीपत्रक, निबंध स्पर्धा, ऐतिहासिक सहल, व्याख्यान आदींचे आयोजन करण्यात येते. वैचारिक लेख स्पर्धेत यावर्षी 32 लेख संकलीत झाल्याची माहिती उपप्राचार्य डॉ.देवर्षी यांनी दिली. सदर स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी वैभव कुलकर्णी, प्रतिक्षा फोलाने, दिव्या दळवे, श्रद्धा शिंदे, भताने यांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिन या विषयावरील भित्तीपत्रकांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपप्रचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी करून उपस्थितांचे आभार प्रा.कविता कोंडपल्ले यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापकवृंद यांची उपस्थिती होते.