अंबाजोगाई : पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या निर्देशांनुसार जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधीतुन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामिण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सव्वा कोटी रुपयांचा अतिरीक्त निधी प्राप्त झाल्यामुळे रुग्णसेवेत नवनविन सुविधांचा समावेश होणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये स्वाराति रुग्णालयाकरीता जिल्हा वार्षिक योजना निधीमुळे स्त्रीरोग विभागात दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रीयांची सुविधा नव्याने सुरु होणार असुन सर्जरी विभागात मेंदुवरील शस्त्रक्रीया तसेच सर्जिकल आयसीयु ला वाढीव बेड, व्हेन्टीलेटर यासह नविन लॅपॅरोस्कोपी युनिट, नविन ऑपरेशन टेबल , रक्तवाहीन्यांच्या व मुत्राशय शस्त्रक्रीयांसाठी आवश्यक सामुग्री मिळणार आहे.
सदरील निधीमुळे नाक कान घसा विभागाला देखील नविन यंत्रसामुग्री मिळनार असुन रुग्णसेवेचा दर्जा ऊंचावणार आहे. जिल्हा नियोजन मंडळाअंतर्गत इतका मोठा निधी स्वाराती रुग्णालयांनी प्रथमच प्राप्त झाला असुन या निधी मुळे रुग्णसेवेचे श्रेणीवर्धन होण्यास नक्कीच मदत मिळेल. स्वा.रा.ति. रुग्णालयाच्या परीसरात ओपीडी, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह यासह नविन लायब्ररी आणि अद्ययावत शवविच्छेदनगृह अशी अनेक विकासकामे गतीने सुरु असुन गत पाच वर्षांत येथील एमबीबीएस च्या जागा 100 ने वाढल्या आहेत.
पालकमंत्री ना.पंकजाताई तसेच खासदार डॉ. प्रितमताई यांच्या नेतृत्वात स्वारातिचा रुग्णसेवेचा दर्जा प्रचंड ऊंचावला असुन रुग्णांना शुद्ध पाणी ते अत्याधुनिक तंत्राच्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रीयांची ऊपलब्धता मुंडे भगिनींमुळे मुबलक प्रमाणात झाली आहे.