नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन

अंबाजोगाई : येथील त्रिंबकेश्‍वर शिक्षण संस्था, संचलीत नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयात गुरूवार, दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी.डी.चव्हाण तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गुरूदेव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रभाकर माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रभाकर माने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षकांची कर्तव्य व जबाबदार्‍या कशा असाव्यात या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक जी.डी.चव्हाण यांनी शिक्षकांचे आचारसंहिता व त्याचे पालन काटेकोरपणे कसे करावे या विषयी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामकिसन मस्के यांनी केले तर उपस्थितांचे आभार वसंत ढगे यांनी मानले. या कार्यक्रमास नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.