अंबाजोगाई : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना आपली नोंद करता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवार दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी प्रत्येक तहसिलस्तरावरून सामायिक सेवा केंद्राद्वारे (सीएससी) शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 10 शिबिरे यासाठी घेतली जाणार असून यामध्ये शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत व मोबाईल फोन सह उपस्थित राहणे गरजेचे असून याद्वारे योजनेसाठी त्यांची नोंदणी केली जाणार आहे. या शिबिरांचा लाभ सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावा, कागदपत्रांसह नोंदणी करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी केली आहे.