अंबाजोगाई : तालूक्यातील आपेगाव येथील शेतकऱ्यांनी 2018 मध्ये खरीप पीकाचा विमा भरला होता. परंतु अजूनही विम्याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यात आपेगाव ते अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर दि. 13 सप्टेंबर रोजी शेतकरी कुटुंब पायी मोर्चा काढणार आहेत. हे अंतर किलोमीटर आहे.
जिल्हयात 2018 मध्ये सरासरीच्या तुलनेत अत्यअल्प पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. आपेगाव येथील शेतकऱ्यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स या कंपनीत विमा भरला. परंतु अदयापही कंपनीने येथील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दिले नाहीत. यामूळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा संबधित विभागास निवेदने दिली. परंतु प्रश्न मार्गी लागला नाही. शुक्रवारी शेतकरी सहकुटुंब मोर्चा काढणार आहेत. सुदर्शन शिंदे, संतोष शिंदे, अशोक शिंदे, वासुदेव तट, नरेंद्र तट, उत्त्म शिंदे, बाळासाहेब शिंदे, कल्याण तट यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.