बाळासाठी दुध आरोग्यवर्धक – डॉ. आर. टी. अंकुशे

पोषण आहार विषयक जागृती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

अंबाजोगाई : मानवाच्या पोषणाची सुरूवात आईच्या गर्भात असल्यापासुनच होत असते. त्यामुळे गरोदर महिलांनी पोषक आहार घेतला पाहिजे. पहिले दुध नवजात शिशुला पाजले पाहिजे. ज्यामुळे बालकाची प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. दररोज महिलांनी वेगवेगळ्या 5 रंगाचे पदार्थ ही खाल्ले पाहिजेत ज्यातून शरीरास पोषक द्रव्य मिळण्यास मदत होते असे प्रतिपादन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. आर. टी. अंकुशे यांनी केले. ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 1 ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत पोषण माह आयोजित केला आहे. त्यामुळे महिनाभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणुन बुधवार,दि. 4 सप्टेंबर रोजी ‘पोषण आहार जागृती विषयक मार्गदर्शन शिबीराचे’ आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला गुंडरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.आर .टी. अंकुशे, डॉ. प्रशांत दहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. इंद्रजीत भगत यांनी केले. यावेळी कोल्हापुर-सांगली येथील पुरग्रस्तांना मदत निधी जमा करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल पुजा सापते या विद्यार्थीनीचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रशांत दहिरे यांनी बदलत्या जीवन शैलीमुळे होणार्‍या आजारांची माहिती दिली. भाजीपाला व फळे हे नैसर्गीक आवस्थेतच खाल्ले पाहिजेत असते सांगुन समतोल आहार,तणाव मुक्ती दिनचर्या या बाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ. वनमाला गुंडरे यांनी सांगितले की,समतोल आहार घेणे हे महिलांसाठी आवश्यक आहे. उपवासामुळे अनेक स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होतो.म्हणुन समतोल आहाराविषयीची जागृकता निर्माण होण्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनंत मरकाळे यांनी करून उपस्थितांचे आभार कु.मयुरी जाधव हिने मानले. कार्यक्रमासाठी डॉ.दिलीप भिसे, प्रा.तत्तापुरे, प्रा. शैलेश जाधव, प्रा. करूणा देशमुख, प्रा. साखरे आदींचही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी हजर होते.