“स्वररंग” संगीत विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न

अंबाजोगाई : “स्वररंग” संगीत विद्यालय अंबाजोगाईच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम दिनांक 1 सप्टेंबर 2019 रोजी संपन्न झाला. याप्रसंगी जागतिक कीर्तीचे पखवाज वादक पंडित उद्धव बापू आपेगावकर यांच्या पखवाज एक संवाद सप्रयोग मार्गदर्शनाने विद्यार्थी व रसिक मंत्रमुग्ध झाले. यापवेळी अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते व कलाप्रेमी उल्हास दादा पांडे व प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राहुल देशपांडे तसेच विद्यालयाचे पालक मधुसूदन पुराणिक इत्यादींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अभंग भक्तीगीत भावगीत व ख्याल गायन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव माने, मुक्ता लाड, यशश्री गुट्टे, सृष्टी देशपांडे, श्रावणी कुलकर्णी, हरीश लाड, सतीश भोसले, बळीराम उपाडे व प्रियंका कांबळे इत्यादीने परिश्रम घेतले. सूत्रसंचालकाची धुरा कुमारी सिद्धी देशपांडे कुमारी स्वराली पुरानिक व कुमारी यशश्री गुट्टे यांनी सांभाळली. तबला संगत बंकट बैरागी, रत्नदीप शिगे, उल्हास पांडे यांनी केली. संवादिनीची संगत कुमारी सृष्टी देशपांडे प्राध्यापक शैलेश पुराणिक यांनी केली.