अंबाजोगाई : सांगली, कोल्हापूर भागात आलेल्या मुसळधार पावसाने व पुराने तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. या पुराचा फटका अनेक गावांना बसला होता. या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून हजारों हात पुढे आले. शहरातील वकील संघानेही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार्य केले असुन संघातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थीक योगदान देण्यात आले आहे. वकील संघाकडून एकुण १४ हजार ७०० रूपायांची मदत पाठविण्यात आली असल्याची माहिती ॲड. शरद लोमटे, उपाध्यक्ष ॲड.जयंत भारजकर सचिव ॲड. महेश तोडकर सहसचिव ॲड. आकाते व वकील संघाचे कर्मचारी सिध्देवर स्वामी यांनी सांगितले.