परळीत नगर परिषदेच्या वतीने ५०० अपंगांना प्रत्येकी १ हजाराचे धनादेश वाटप
परळी : अपंगाच्या मदतीसाठी १२ महिने, २४ तास आपण उपलब्ध राहु, जोपर्यंत श्वास श्वासात आहे तो पर्यंन्त अपंगाचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी कटिबध्द राहु अशी ग्वाही राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. एखाद्याचे अपंगत्व जात असेल तर त्यासाठी लागणारे साहित्यही नाथ प्रतिष्ठान देईल, नगर परिषद, पंचायत समिती परळीच्या माध्यमातुनही अपंगांना सहकार्य राहील असे शब्दही त्यांनी याप्रसंगी बोलतांना दिला.
परळी नगर परिषदेच्या वतीने अपंगांना रविवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रत्येकी 1 हजार रुपयांचा धनादेश लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे या होत्या.
यावेळी बोलंताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, अपंगांना सहकार्य व्हावे यासाठी शासन स्तरावर अनेक निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडले. शिवशाही बस मध्ये अपंगांना सवलत, घरकुलास प्राधान्य यासाठी संबधीत मंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी आग्रह केला. त्यांच्या अंमलबजावणी करण्यात आली. यापुर्वी नगर परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातुन अपंगांना निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. पंचायत समिती परळीच्या वतीने २०० अपंगांच्या खात्यावर प्रत्येकी १ हजार रुपयांची रक्कम लवकर जमा करण्यात येईल. आता पर्यंन्त पंचात समिती मार्फत २९ लक्ष रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. या दोन्ही संस्थेच्या माध्यमातुन यापुढेही सहकार्य राहील. आपणही नाथ प्रतिष्ठानच्या वतीने अपंगाच्या साहित्यासाठी मदत करण्यास तयार आहोत. शहरात अपंग व पेन्शन भवन एक कोटी रुपये खर्चुन नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. अपंगांना परळी नगर परिषद व डॉ.संतोष मुंडे यांच्या पुढाकारातुन धनादेश प्राप्त होत आहेत. या पुण्य कामाचे हक्कदार नगर परिषद व डॉ.संतोष मुंडे हे आहेत. नगर पालिकेच्या स्थानिक निधीतुन अपंगांना मदत करावी यासाठी संतोष मुंडे यांनी आपल्याकडे पाठपुरवा केला. व आपण नगर परिषदेस सुचना केल्या त्यामुळे हा निर्णय घेता आला.
यावेळी व्यासपीठावर न.प.चे उपनगराध्यक्ष आयुब खा पठाण, पंचायत समितीचे उपसभापती बालाजी उर्फ पिंटु मुंडे, नागापुरचे सरपंच मोहन सोळंके, न.प.चे शिक्षण सभापती संजय फड, माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.