अंबाजोगाई : छायाकृती-द-लाईट आर्ट-पॅकेट ऑफ फोटो आर्टीस या ग्रुपच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व कला दालनात फोटोग्राफी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील 21 छायाचित्रकारांनी सहभाग नोंदवत आपले छायाचित्र प्रदर्शनात मांडले होते. राज्यस्तरीय झालेल्या या प्रदर्शनात अंबाजोगाईच्या सचिन सोमवंशी यांनी आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याची फोटोग्राफी प्रदर्शनात आकर्षक ठरली. या फोटोग्राफीला गोल्ड अवॉर्ड जाहिर झाला आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन फोटो जर्नालीस्ट श्रीकृष्ण परांजपे, जलसंपदा विभागाचे मुख्यकार्यकारी अभियंता प्रविण कोले, स्ट्रारटा ग्रुपचे कार्यकारी संचालक अमोल चाफेकर तर सुनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रदर्शनात राज्यातील 21 छायाचित्रकारांनी आपल्या 135 दर्जेदार कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रत्येक छायाचित्रकाराने समाजातील वास्तव विषयांची सुबकता आपल्या कॅमेरेच्या नजरेतुन टिपली होती. गणेश उत्सवातील जल्लोश, महाराष्ट्राच्या धार्मिकतेची ओळख असलेली दिंडी, झाडांच्या व पाणांच्या विविध आकारातून बनलेले प्राणी, पक्षी शनिवार वाड्यातील दरवाजे, खिडक्यातील कलाकृतीची मांडणी, सासवड मंदिराचे निसर्ग चित्र, वास्तु रचनातील सौंदर्य, भिगवन येथील पक्षांचे तसेच वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, नाईट फोटोग्राफीतील सुंदरता, नव रसांचे भाव उमटणारे पोट्रेक्टस सोबतच नवजात शिशुंचे हात, पाय, ओट यांचे मायक्रो फोटोज्, ढगांचे विविध आकार ग्रामीण जीवन शैलीतील फोटोग्राफी अशा अनेक विषयातील कलाकृतीचे छायाचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. या प्रदर्शनात अंबाजोगाईच्या सचिन सोमवंशी यांना उत्कृष्ठ दिंडी फोटोग्राफला गोल्ड अवॉर्ड तर ग्रामीण जीवन शैलीवर औरंगाबादच्या गणेश थोरात यांना सिल्हवर अवॉर्ड, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी प्रसाद दरेकर बारामती यांना ब्रांज अवॉर्ड देण्यात आला. स्पेशल ज्युटी अवॉर्ड आळंदीच्या समाधान गावडे यांच्या झाडातील प्राणी पक्षांच्या आकारातील फोटोला तर फोटो पेंटींग करणार्या सासवड येथील प्रकाश कोल्थे, सचिन भौर यांच्या फोटो आरटीओला विभागुन देण्यात आले.
प्रदर्शनाचे प्रमुख प्रविण भौरे यांनी अतिशय सुंदर फोटो प्रदर्शनाचे नियोजन केल्यामुळे मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर हे प्रदर्शन चालणार असून प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अंबाजोगाईच्या सचिन सोमवंशी यांच्या दिंडी छायाचित्राला गोल्ड अवॉर्ड जाहिर झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.