शासकीय रुग्णालयात बाहेरून औषधं लिहून दिल्यास कडक कारवाई : हसन मुश्रीफ

टीम AM : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधं लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. रुग्णांना आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. औषध खरेदीसाठी मिळणाऱ्या निधीपैकी सुमारे 70 टक्के खरेदी वस्तू प्राधिकरणामार्फत केली जाते, तर उर्वरित 30 टक्के रक्कम संबंधित संस्थांकडून खर्च केली जाते.

याशिवाय जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीतूनही आवश्यक औषधांची खरेदी केली जात असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here