बीड जिल्ह्यात घरगुती गॅसच्या अवैध वापरावर प्रशासनाची मोठी कारवाई, गुन्हे दाखल, वाचा…!

टीम AM : बीड जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेसाठी 19 पथकांची स्थापना करून जिल्हाभर तपासणी करण्यात आली. 

या कारवाईदरम्यान 203 आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 13 ठिकाणी घरगुती गॅसचा अवैध वापर आढळून आला. या प्रकरणात 28 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 10 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here