टीम AM : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि राज्य सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काळी दिवाळी साजरी करण्यात येत आहे.
याच आंदोलनाचा भाग म्हणून अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येत काळी दिवाळी साजरी केली. यावेळी चटणी – भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसमोर निर्माण झालेल्या संकटाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दिवाळीसारख्या सणाच्या काळातही शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे गांभीर्य अधोरेखित करत आंदोलकांनी सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. या आंदोलनात प्रमोद बगाडे, खाजामिया पठाण, अमोल हतागळे, परमेश्वर लांडगे, अजय वाघमारे, अविनाश घनघाव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



