केज नगरपंचायतच्‍या वतीने स्‍मार्ट गृहीणी प्रतियोगिता स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्‍न

केज : स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०१९ उपक्रमांतर्गत केज शहर स्‍वच्‍छ करण्‍यासाठी नगराध्‍यक्ष आदित्‍य दादा पाटील यांच्‍या मागदर्शनाखाली स्‍मार्ट गृहिणी प्रतियोगिता स्‍पर्धाचे आयोजन नगर पंचायतच्‍या वतीने करण्यात आले होते. केज शहरातील महिलांना घरातील ओला व सुका कचरा विलगीकरण करण्‍यासाठी व नगर पंचायतमधील कर्मचा-यांनी तो कचरा घंटागाडीच्‍या माध्‍यमातुन योग्‍य ठिकाणी विल्‍हेवाट लावणे यासाठी प्रोत्‍साहन करण्‍यासाठी स्‍पर्धोचे आयोजन करण्‍यात आले होते.
सदरील स्‍मार्ट गृहीणी स्पर्धेत पहिले बक्षीस कुलर, दुसरे बक्षीस मिक्‍सर, तृतीय बक्षीस डिनर सेट व उत्‍तेजनार्थ बक्षीस सोन्‍याची नथ हे देण्‍यात आले. सदरील प्रतियोगितेचे बक्षीस वाटपाचा कार्यक्रम नुकताच नगराध्‍यक्ष आदित्‍य दादा पाटील यांच्‍या अध्‍यक्षेखाली घेण्‍यात आला. या स्‍पर्धांतील प्रथम क्रमांक श्रीमती पार्वती केदार यांना कुलर, दुसरे बक्षीस श्रीमती महानंदा साखरे यांना मिक्‍सर, तृतीय बक्षीस श्रीमती निलावती बारगजे यांना डिनर सेट व उत्‍तेजनार्थ श्रीमती अनिता काटके, आयशा पठाण, करीमा शेख व अरशीया इनामदार यांना सोन्‍याची नथ बक्षीस देण्‍यात आले.

सदरील बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्‍ये युवा नेते राहुल भैय्या सोनवणे, माजी नगराध्‍यक्ष पशुपतीनाथ दांगट, उपनगराध्‍यक्ष साहेराबेगम दलिलमियॉं इनामदार, माजी नगराध्‍यक्ष कबीरोद्दिन इनामदार, नगरसेवक महादेव लांडगे, प्राचार्य लक्ष्‍मण डोईफोडे, सभापती रविंद्र अंधारे, नगरसेवक शिवाजी हजारे, नगरसेवक जकीयोद्दीन इनामदार, मुख्‍याधिकारी सचिन देशपांडे, दिनकर राऊत हे होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. विद्या पिंपळवाडकर यांनी केले तर प्रास्‍ताविक भुसारी श्रुती यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्‍याधिकारी सचिन देशपांडे यांनी केले.