क्षिरसागरांचे कट्टर समर्थक विनोद पोखरकर शिवसेनेच्या वाटेवर?

अंबाजोगाई : डॉ भारतभुषण क्षिरसागर व जयदत्त क्षिरसागर यांचे कट्टर समर्थक तडफदार युवा नेतृत्व विनोद पोखरकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त असुन ना.जयदत्त आण्णा यांच्या स्वागताचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमुळे अंबाजोगाईसह जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे की पोखरकर परिवारातील वारस पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

तसं पाहिलं तर विनोद पोखरकर यांचा शिवसेनेत प्रवेशाची ही काय नविन गोष्ट नाही कारण या परिवाराचे संबध तसेच विचार हे शिवसेनेशी जुळलेले आहेत. कै.वसंत अप्पा पोखरकर यांनी शिवसेनेची पहिली शाखा अंबाजोगाईत स्थापन करून सर्वत्र भगवे वादळ पेटविले होते. विनोद पोखरकर यांची प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. वाणी समाजाचे नेतृत्व तथा तालुक्यातील युवकांचे आधारस्तंभ विनोद पोखरकर आहेत. व्हायरल झालेल्या फोटोत जयदत्त आण्णाचे निष्ठावान कार्यकर्ते दिनेश परदेशी, किशोर गिलवरकर, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन मुडेगावकर हे सर्व जयदत्त क्षिरसागर व डॉ. भारतभुषण क्षिरसागर यांचा सत्कार करीत असताना दिसत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात विनोद पोखरकर यांनी बचत गटाच्या माध्यमातून व बँकेच्या मार्फत युवकांना नविन उद्योग उभारणीसाठी सातत्याने मदत केली आहे. विनोद पोखरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर नक्कीच जिल्ह्याबरोबर अंबाजोगाई तालुक्यातही शिवसेना पक्ष वाढण्यास मदत होणार असुन याचा प्रभाव आगामी नगरपालिका निवडणुकीतही दिसुन येईल ऐवढे मात्र नक्की?