इंग्लंड अंतर क्लब स्पर्धातयुवा फलंदाज भूषण नावंदेने ठोकले सलग दुसरे शतक

परळीच्या क्रिकेटपटूचा पुन्हा सातासमुद्रापार विक्रम

परळी : परळी तालुक्यातील मौजे परचुंडी येथील रहिवाशी तथा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा मुलगा युवा फलंदाज भूषण नावंदेच्या (103) शतकाच्या जोरावर बॅटर्सी क्लबने किनलौ स्पोट्‌स क्लबवर शानदार विजय मिळवला. ही इंग्लंडमधील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा आहे. गत सामन्यातही भूषणने ऍक्शन क्लब विरुद्ध 125 धावा काढल्या होत्या. सलामीवीर भूषण नावंदेने हे सलग दुसरे शतक ठरले. भूषण याने क्रिकेटच्या इतिहासात परळीचे नाव पुन्हा एकदा सातासमुद्रापार केले आहे.

भूषणच्या या इतिहासाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. किनर्ली मैदानावर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून बॅटर्सी क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅट र्सी क्लबने 50 षटकात 7 बाद 261 धावा केल्या. त्यानंतर किनर्ली क्लबला निर्धारित षटकात 216 धावा पर्यंत मजल मारता आली. बॅटर्सीकडून भूषण नावंदेने 87 चेंडूचा सामना करताना 103 धावांची खेळी केली. त्यात त्याने आकरा चौकार खेचले. मॅटने 57 चेंडूत 52 धावा काढल्या. यापूर्वी झालेल्या सामन्यात भूषणने ऍक्शन क्लब विरुद्ध शतक आणि विम्बल्डन क्रिकेट क्लब विरुद्ध 57 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. भूषण हा प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा मुलगा असून संगम येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे यांचा पुतण्या आहे. त्याच्या यशाबद्दल सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन हो आहे.