बेवारसांचे दातृत्व जपणारे मुख्तार शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबाजोगाई शहराध्यक्ष, वाचा…!

टीम AM : जाती – धर्माच्या सीमा ओलांडत गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो बेवारस मृतदेहांचा अंत्यसंस्कार करून मानवतेची सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते मुख्तार शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी [अजित ‌पवार गट] अंबाजोगाईच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी आणि माजी आमदार संजय दौंड यांची उपस्थिती होती.

मुख्तार शेख यांच्या या नियुक्तीचे शहरात तसेच जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात येत असून, पक्ष संघटनाला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मानवतेच्या सेवेतून ओळख बनवलेल्या मुख्तार शेख यांच्या नेतृत्वामुळे शहरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.