टीम AM : पुणे – माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून थार गाडी पाचशे फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला असून ते तरुण पुण्यातील रहिवासी आहेत. या मंगळवारी दिवसभर या तरुणाचा संपर्क होत नव्हता त्यामुळे पुणे आणि माणगाव पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. पुण्यातील खडकवासला – उत्तम नगर येथील सहा पर्यटक मध्यरात्री कोकण पर्यटनासाठी रात्री निघाले होते, त्यावेळी हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे.
ताम्हिणी घाटात थार गाडी दरीत कोसळल्याचा कोणालाही पत्ता नव्हता. कठडा तुठल्याचे कळल्यानंतर येथे अपघात झाल्याचे स्थानिकांना समजले. या थार कारचा नोंदणी क्रमांक एमएच 14 एचडब्यू 7575 असा आहे. पुण्यातील हे तरुण सोमवारी रात्री थार कारने कोकणात फिरायला निघाले होते. परंतू, त्यांच्या मोबाईलशी संपर्क होत नसल्याने त्यांचा शोध सुरु करण्यात आला. रेस्क्यू पथकाने रोपच्या सहाय्याने खाली दरीत उतरुन या तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर यात सहाही तरुणांचा मृ्त्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व मृत झालेले तरुण हे 22 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.
मृतांची नावं खालीलप्रमाणे
अपघातातील सर्व तरुण हे पुणे येथील उत्तमनगर येथील रहिवासी असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. साहील साधू गोटे (24), शिवा अरुण माने (19), ओंकार सुनील कोळी (18), महादेव कोळी (18), प्रथम रावजी चव्हाण (24), पुनीत सुधाकर शेट्टी (20) अशी अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत.



