अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक : 19 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत आज दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी एकूण 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 18 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी दिली आहे.

अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक सुमारे आठ वर्षांनंतर होणारी असल्यामुळे यंदाची निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक प्रभागांत चुरशीची लढत अपेक्षित असून उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम सामना अधिक स्पष्ट होत आहे.


उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची प्रभागनिहाय यादी

अ. क्र. उमेदवाराचे नाव प्रभाग क्रमांक

  1. मोदी सुनीता राजकिशोर 1 (योगेश्वरी)
  2. शेख जाहिदा बेगम रफीक 1 (योगेश्वरी)
  3. हेडे कमलाकर महादेवऱाव 2 (रविवारपेठ)
  4. मणियार अबू असीम म. फरोख 2 (रविवारपेठ)
  5. काले स्नेहा सुधर्शन 2 (रविवारपेठ)
  6. हेडे शिला कमलाकर 2 (रविवारपेठ)
  7. लोमटे अक्षयनी किशोर 5 (परळीवेस)
  8. कराड जीवनराव नामदेवराव 6 (आदर्श कॉलनी)
  9. वाचाळकर सुप्रभा सुनील 6 (आदर्श कॉलनी)
  10. गोस्वामी कल्पना श्रीकांत 6 (आदर्श कॉलनी)
  11. मोदी शुभांगी आलोक 10 (गुरुवारपेठ)
  12. सय्यद हुजैफा फारान ताहिर 10 (गुरुवारपेठ)
  13. सरवदे ज्योती धम्मपाल 11 (गवळीपुरा)
  14. सरवदे सोनाली गुरु 11 (गवळीपुरा)
  15. गवळी जावेद इस्माईल 11 (गवळीपुरा)
  16. शेख नुजहत तरन्नुम 12 (सदर बाजार)
  17. जगदाळे प्रियंका महादेव 13 (‘एमआरटी’ दवाखाना)
  18. पठाण सैफ खान अमजद खान 14 (लाल नगर)
  19. मोदी संकेत राजकिशोर (नगराध्यक्ष पदासाठी)