अंबाजोगाईत भाड्याच्या फ्लॅटवर सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : दोन महिलांची सुटका

टीम AM : पोखरी रोड परिसरातील पिताजी सारडा नगरीतील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅटवर सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर अंबाजोगाई शहर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाईचे नियोजन केले. पंचांच्या उपस्थितीत डमी ग्राहक तयार करून त्याच्यामार्फत संबंधित फ्लॅटवर पाठवण्यात आले. व्यवहार निश्चित झाल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकत दोन महिलांची सुटका केली.

या प्रकरणी शिवकन्या नवनाथ फड (वय 40) हिच्याविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून काही साहित्यही जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here