जुन्या पुस्तकांतून घडली यशाची कहाणी ! करिष्मा मेश्रामची ‘एमपीएससी’ त राज्यात बाजी….!

टीम AM : चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील वडसी गावच्या करिष्मा अनिरुद्ध मेश्राम हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘एमपीएससी’ परीक्षेत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. अनुसूचित जातीतील महिला गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावत तिची ‘सहायक वनसंरक्षक’ पदावर निवड झाली आहे. 

करिष्माचे वडील अनिरुद्ध मेश्राम शेतमजुरीसोबत छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणाला नेहमीच प्राधान्य दिलं.  

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करताना करिष्माने आर्थिक अडचणींवर मात करत रात्रंदिवस अभ्यास केला. जुन्या पुस्तकांपासून स्वतःच्या नोट्सपर्यंत तिने प्रत्येक साधनाचा उपयोग केला. विशेष म्हणजे तिचा भाऊ उमेश याआधी ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘पीएसआय’ झाला आहे. करिष्माच्या यशाने आई – वडिलांच्या कष्टाला खऱ्या अर्थाने फळ मिळालं असून तिची कहाणी ग्रामीण भागातील हजारो मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here