टीम AM : राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ – एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून देणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा, हा यामागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. सहलींसाठी शाळा, महाविद्यालयांना सवलतीत बस उपलब्ध करून दिल्यानं, महामंडळाला मागच्या वर्षी 92 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला होता. त्याअनुषंगानंच यावर्षी देखील या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे..



