टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (स्वाराती) परिचारिकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 15 मेपासून बेमुदत संप सुरू केला आहे. दोन दिवसांच्या लाक्षणिक आंदोलनानंतरही प्रशासनाकडून तोडगा न निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
अतिरिक्त घरभाडे भत्त्याची थकबाकी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सहा वर्षांचा प्रलंबित भत्ता, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी सुविधा तसेच जीर्ण निवासस्थानांची दुरुस्ती या प्रमुख मागण्या आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत कामावर न परतण्याचा पवित्रा परिचारिकांनी घेतला असून, आंदोलनामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



