जातीअंत संघर्ष समितीचे अंबाजोगाईत तीव्र निदर्शने : उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन…!

टीम AM : जातीय विद्वेषातून महाराष्ट्रात होत असलेल्या दलितांच्या व शोषितांच्या हत्या आणि त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात येत असल्याने त्याच्या निषेधार्थ अंबाजोगाईत जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत उपजिल्हाधिकारी यांना ‌निवेदन देण्यात आले.

उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभर धर्मांध आणि जातीयवादी भाजपा व ‘आरएसएस’ ची सत्ता आल्यापासून अस्पृश्य, आदिवासी व अल्पसंख्यांकांचा छळ केला जात आहे. ‘आयआयटी’ असो की विद्यापीठ, साहिल वाकोडे सारख्या तरुणांना मरण्यासाठी मजबूर केले जाते, शेटफळ सारख्या गावात वस्तीवर गावगुंड लोक सामूहिक हल्ले करतात, तर वैजापूरला रोहित पठारे यांची निर्घृण हत्या होते. यात सरकार व त्यांची यंत्रणा सहभागी आहे. गावगुंड, बेबंद झुंडी आणि बेलगाम हल्लेखोर यांना सरकारची फूस आहे. कारण हे सरकार केवळ धर्मांधांचे नाही तर कॉर्पोरेटच्या संगनमताचे आहे. 

सरकारने जातीय अत्याचारास लगाम घातला पाहिजे.सोबतच पीडित जनतेच्या निवाऱ्यावर बुलडोझर फिरवून घरदारे व दुकाने बेचिराख केली जात आहेत. अंबाजोगाई हे त्याचे उदाहरण असून या लोकांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा, नसता जनता मोठा संघर्ष करेल, याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर  कॉ. बब्रुवाहन पोटभरे, बहुजन विकास मोर्चाचे विनोद शिंदे, अभिमान कुंडाळ, बाबा शेख, सुहास चंदनशिव, प्रशांत मस्के यांच्यासह आदींच्या सह्या आहेत. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला ‌सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here