टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 22 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासोबतच नगरसेवक पदासाठी 205 अर्ज दाखल झाल्याने स्पर्धा चुरशीची होणार आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दिवसभर उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी नगरपरिषद परिसरात पाहायला मिळाली. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांचाही यात मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.
आगामी काही दिवसांत अर्ज छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडणार असून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. अर्जांच्या मोठ्या संख्येमुळे अंबाजोगाईतील निवडणूक रंगतदार होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



