टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारी अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून अंतिम वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी 15 उमेदवार वैध ठरले आहेत. यामुळे शहरात नगराध्यपदाची लढतीची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
दरम्यान, नगरसेवक पदासाठी सर्व 15 प्रभागांमध्ये मिळून एकूण 144 उमेदवारांची उमेदवारी वैध ठरली आहे. काही प्रभागांत बहुरंगी लढत तर काही ठिकाणी थेट चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. वैधता मिळाल्यानंतर सर्व उमेदवारांनी प्रचाराला वेग देण्यास सुरुवात केली असून मतदारांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे.
आगामी दिवसांत अर्जांची माघार प्रक्रिया होणार असून अंतिम स्पर्धकांची अधिकृत यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, संपूर्ण शहरात राजकीय वातावरण तापले असून अंबाजोगाईतील ही निवडणूक रंगतदार आणि रोचक होण्याचे संकेत मिळत आहेत.



