स्व. नाना पालकर स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे 26 सप्टेंबर रोजी आयोजन

अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने खोलेश्‍वर महाविद्यालयामध्ये प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी ही स्व.नाना पालकर स्मृती आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन गुरूवार,दि. 26 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे 49 वे वर्ष आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक तथा प्राचार्य, खोलेश्‍वर महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे.

स्पर्धेचे विषय पुढील प्रमाणे आहेत.“1)चला निघु या सरसावोनी देशाच्या उद्धरणी.,2) बरे झाले 370 रद्द झाले.,3) कौशल्य शिक्षण : प्रगतीचे लक्षण.,4)गर्दीत माणसांच्या माणूस शोधता मी.” हे असून सदर स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ,नांदेड यांच्याशी संलग्न असलेले विद्यार्थी व त्यांच्याशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांना म्हणजे संघास भाग घेता येईल.

पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. स्पर्धेचे सांघीक शुल्क 100 रूपये राहिल , अधिक गुण प्राप्त करणार्‍या संघाला (एक वर्षासाठी) स्मृती चषक देण्यात येईल. सदर चषक विजेत्या महाविद्यालयाकडे 1 वर्ष राहिल. सदर स्पर्धा ही गुरूवार,दि.26 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. स्पर्धेचे संयोजक प्राचार्य खोलेश्‍वर महाविद्यालय अंबाजोगाई हे असतील. स्पर्धेचे इतर नियम महाविद्यालयास पाठविलेल्या पत्रकात दिलेले आहेत. स्पर्धेतील पारितोषिके पुढील प्रमाणे असतील. प्रथम 3 हजार 501/- रूपये, द्वितीय 2 हजार 501/- रूपये, तृतीय 1 हजार 501/- रूपये तर सांघीक गुणावर फिरते स्मृतीचषक असे आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी (स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर भ्रमणध्वनी 9405102532, 7020582995 आणि स्पर्धा सहप्रमुख प्रा.शामराव बारडकर मो.-8830460805, 9420015650, दुरध्वनी क्रमांक- 02446-247018) येथे संपर्क करावा. या स्पर्धेसाठी विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक तथा प्राचार्य खोलेश्‍वर महाविद्यालय, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे.