अंबाजोगाई : पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी निमित्य पू. ल. देशपांडे यांच्या अपरिचित साहित्यावर आधारित त्यांचे कांही गद्य व कविता तसेच त्यांनी गायिलेल्या व स्वरबद्ध केलेल्या रचनांचे सांगीतिक सादरीकरनाचा अपरिचित पूल हा कार्यक्रम शनिवार 21 सप्टेंबर रोजी अंबाजोगाईत सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती शब्दवेध, पुणे यांची असुन संकलन व दिग्दर्शन प्रसिद्ध नाट्य कलावंत व गायक चंद्रकांत काळे यांनी केली आहे.
पुलंच्या अपरिचित साहित्याचे वाचन नाट्य कलावंत चंद्रकांत काळे, सुप्रसिद्ध नाटककार व सिने व नाट्य अभिनेते डॉ. सतीश आळेकर व गजानन परांजपे करणार आहेत. या कार्यक्रमाला संगीत दिले आहे नरेंद्र भिडे तर संवादिनीवर आदित्य मोघे तर तबल्याची साथ अमृत द्रविड करणार आहेत.
हा कार्यक्रम 21सप्टेंबर 2019 शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजता योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या नागपूरकर सभागृहात आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे सयूंक्त संयोजक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र अंबाजोगाई, योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय (रौप्य महोत्सवी वर्ष) व यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाई हे आहेत. या कार्यक्रमास मुक्त प्रवेश असणार आहे. तरी या कार्यक्रमास अंबाजोगाईतील सर्व रसिक श्रोत्यांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्र अंबाजोगाईचे अध्यक्ष अनिकेत लोहिया, व सचिव डॉ. नरेंद्र काळे, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाले व सचिव गणपत व्यास. स्वा. रा. ति. महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश सोनवळकर व यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे, डॉ. कमलाकर कांबळे, सुधीर वैद्य व सतीश लोमटे यांनी केले आहे.